कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात विलीन झाला.
कणकवली येथील सभेत आज राणे कुटुंबियांसह स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱयांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मागील काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राणेंसह त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांना भाजपाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्याच प्रचारासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस कणकवली येथे आले होते. त्यावेळी हा विलिनीकरण सोहळा पार पडला.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंचा राजकीय आलेख घसरत चालला होता. अखेर त्यांनी भाजपाशी जवळीक साधत राज्यसभेवर खासदारकी मिळवली. त्यानंतर
त्यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्याचा निर्णय घेतला होता.