वार्ताहर/ मौजेदापोली
तालुक्यातील पाळंदे येथे होंडा कंपनीची चारचाकी गाडी व मारूती सुझुकी या दोन चारचाकी गाडय़ांमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. गुरूवारी दुपारी 2.30 च्या सुमारास पाळंदे येथील हॉटेल साहील इनजवळ ही घटना घडली.
सुधाकर नरवडे (पुणे) व घाणेकर (चिपळूण-खेर्डी) यांच्या मालकीच्या या गाडय़ा होत्या. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी रिक्षा व चारचाकी गाडीचा अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर रिक्षातील प्रवासी जखमी झाले होते. या मार्गावर प्रचंड प्रमाणात झाडे वाढली असल्यामुळे समोरून येणाऱया गाडीचा अंदाज येत नसल्याचे गाडीचालकांचे म्हणणे आहे. तसेच तातडीने या मार्गावरील झाडी तोडून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी गाडीचालक व या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी करत आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन कांबळे करीत आहेत.