वेंगुर्ल्यात गादी सेंटरला आग

52

अन्य दोन दुकानांचेही नुकसान : सुमारे पाच लाखाची हानी

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले शहरातील पिराचा दर्गा येथील जनता गादी सेंटरला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात मुस्ताक अगमद बाबनवर यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच लागूनच असलेल्या इंडियन ट्रव्हल्स व सदगुरू इलेक्ट्रिकलच्या छपराला आग लागून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी व नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत गादी सेंटरचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही.

वेंगुर्ले शहरातील पिराचा दर्गा येथे असलेल्या जनता गादी सेंटरला दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानात असलेल्या तन्वीर फणसोफकर यांनी सदर आग पाहताच ती विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच दुकानातील गादी सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली. या आगीचे वृत्त समजताच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक शैलेश मयेकर, प्रथमेश गावडे, शरद मेस्त्राr, सिद्दीक गोलंदाज, इम्तिहाज मकानदार, सलीम शेख, अमीर शेख, विश्वास गिरप, सदा गिरप, गोटय़ा गावडे, जुबेर जंगुभाई, अल्ताफ जंगुभाई, जमिल जंगुभाई, कैफ मकानदार, जाफर गोलंदाज, नीलेश पाटील, आसद मकानदार, सरताज शेख, सोहेल लगूभाई, राजन गावडे, दानिश नेकनाल, सचिन खानोलकर यांनी प्रयत्न करून आग आटोक्मयात आणली. परंतु भडकलेल्या या आगीत 39 तयार गादी, कापूस पिंजण्याची मशीन, विद्युत मीटर, पाच टय़ुबलाईटस, फॅन आदी सामान तसेच 70 हजार रुपयांचा नवीन कापूस माल जळून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर बाजूला लागून असलेल्या इंडियन ट्रव्हलच्या ऑफिसचे सुमारे एक लाखाचे मिळून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यावेळी नगरसेवक संदेश निकम, नगरसेविका सुमन निकम, नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, न. पं. कर्मचारी सागर चौधरी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीचा शहर तलाठी सरवदे यांनी पंचनामा केला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.