दीपक केसरकर;त्यांची भविष्यात एखादी चौकशी झाल्यास नवल नको
सावंतवाडी : महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे नारायण राणे हे नेहमी वेगवेगळ्या रोलमध्ये दिसतात,ते थापाडे कसे याचा प्रत्यय अवघ्या महाराष्ट्राने घेतला आहे.त्यांना चित्रपटातील काय नाव द्यावे हे माझ्यासारख्या सुसंस्कृत माणसाला योग्य वाटत नाही,अशी टीका माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केली.नारायण राणे ज्या उद्दिष्टासाठी भाजपमध्ये गेले होते.ते उद्दिष्ट आता भाजपची सत्ता गेल्यामुळे अपूर्ण राहिले आहे.त्यामुळे भविष्यात त्यांची एखादी चौकशी झाल्यास नवल वाटायला नको,असाही चिमटा केसरकर यांनी यावेळी काढला.