केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांचे राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले अभिनंदन…दिल्ली येथे घेतली भेट…

15

वैभववाडी/प्रतिनिधी:-

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भेट घेत अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आदरणीय नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री विनोद तावडे यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांचे त्यांनी अभिनंदन केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ना. नारायण राणे यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते, पदाधिकारी, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार यांच्याकडून ना. राणे यांचे अभिनंदन केले जात आहे.