सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-
केंद्रीयमंत्री नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार दिल्लीत दाखल झाले आहेत.
राज्यातील सर्व दौरा प्रमुखांची राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी बैठक घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची संकल्पना सर्व मंत्र्यांनी जनते समोर जाऊन आशिर्वाद घ्यावेत. म्हणुन मंत्र्याच्या दौर्याचे नामकरण ‘ जन आशिर्वाद यात्रा ‘ आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे ,आमदार सुनिल राणे, आमदार संजय केळकर , आमदार निरंजन डावखरे उपस्थित असणार आहेत.