वैभववाडी/प्रतिनिधी:-
तालुक्यातील लोरे नं.2 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रूपेश पाचकुडे यांनी 61 मतांनी भाजपच्या विजय मांडवकर यांचा पराभव केला .या विजयामुळे शिवसेना गोटात उत्साहाचे वातावरण होते.
या विजयानंतर पाचकुडे यांनी शिवसेना नेते अतुल रावराणे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले रावराणे यांनी शाल श्रीफळआणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख मंगेश लोके,संभाजी रावराणे यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.
लोरे जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकूडे, सरपंच विलास नावळे यांच्या नेतृत्वाखाली लोरे गावातील मतदारांनी व शिवसैनिकांनी लोरे उपसरपंच कै. दीपक पाचकूडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या लोरे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रुपेश पाचकूडे यांना 195 अशा प्रचंड बहुमतांनी विजयी करून कै. दीपक पाचकूडेंना श्रद्धांजली वाहीली असल्याचे प्रतिक्रिया अतुल रावराणे यांनी दिली.