वैभववाडी युवासेना शहरप्रमुख पदी सिद्धेश रावराणे यांची निवड…

26

वैभववाडी/प्रतिनिधी:-

युवासेनेच्या शहरप्रमुख पदी वाभवे येथील सिद्धेश रावराणे यांची निवड करण्यात आले. युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी ही नियुक्ती केली आहे. निवडीनंतर खा.विनायक राऊत यांनी रावराणे यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, नेते अतुल रावराणे, सतिश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख मंगेश लोके, नंदु शिंदे, दिगंबर पाटील, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण,संतोष बोडके यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खा.विनायक राऊत शनिवारी वैभववाडी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना व युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खा.राऊत यांनी शुभेच्छा देत संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.