तळेरे/प्रतिनिधी:-
श्रावणी कंप्यूटर तळेरे आणि मेधांश कंप्यूटर कासार्डे आयोजित तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघासमवेत 31 डिसेंबर साजरा करण्याची अनोखी पद्धत गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या सहाव्या वर्षी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी श्रावणी कंप्यूटर तळेरे आणि मेधांश कंप्यूटर कासार्डे चे विद्यार्थी बाळशास्त्री जांभेकर स्मारक परिसराची स्वच्छता करून वनभोजन करत भरकटलेल्या तरुणाई पुढे वेगळा आदर्श घालून देणार आहेत.
31 डिसेंबर जगभरात सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो या मध्ये बहुतांश कार्यक्रम पाश्चात्य संस्कृती प्रमाणे मद्यधुंद होऊन साजरे होताना दिसतात. या अशा कार्यक्रमांना तोड देणारी आणि युवा नेतृत्व घडवणारा कार्यक्रम म्हणून हा उपक्रम ओळखला जाऊ लागला आहे. या दोन्ही संगणक प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास तसेच सामाजिक बांधिलकीचे बीज रुजवण्याच्या प्रयत्नाने सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतात.
यंदाही मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री येथे सध्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा अनुभव हा प्रयोग सलग सहाव्या वर्षी कायम ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांबद्दल नवतरुणांना माहिती व्हावी यासाठी हे दरवर्षी ठिकाणी निवडले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे वनभोजन होऊन मार्गदर्शन सत्र व व्यक्तिमत्व कौशल्य विकास होऊन या उपक्रमाची सांगता होणार आहे.