जिल्हा बँक संचालिका सौ प्रज्ञा ढवण यांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर.

83

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:-

महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणा-या महिला समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन १९९६-९७ पासून देण्यात येत आहेत.

सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षाचे जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अनुक्रमे अर्पिता राजेंद्र मुंबरकर, कणकवली व प्रज्ञा प्रदिप ढवण, कलमठ या महिला समाजसेविकांना जाहीर करण्यात आला आहे. यांचे वितरण १ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमात होणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, रुपये 10 हजार 1 रुपये रक्कमेचा धनादेश, शाल व श्रीफळ आहे.