राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान कोसळल्याने दोघांचा मृत्यू…

45

मुंबई/प्रतिनिधी:-

राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान कोसळलं आहेय हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये विमान कोसळलं आहे. लष्कराचं विमान घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झााला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकला एअरलिफ्ट करण्यत आले आहे. पायलटला एअरलिफ्ट करण्यासाठी वायूसेनेचे एमआय17 पाठवण्यत आले. मिग 21 ज्या घरावर जाऊन कोसळले त्या घरामध्ये तीन महिला आणि एक पुरूष उपस्थित होता. दोन महिलांचा जागेवर मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.