‘एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे’ व्यापारी बांधवांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा – राज्यकर उपआयुक्त एस. आर. मोटकर…

28

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:-

व्हॅट, बीएसटी, सीएसटी कायद्यांतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधिच्या थकबाकी करिता 1 मे ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व व्यापारी बांधवानी घेवून ‘एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे’ टाकावे, असे आवाहन राज्यकर उपआयुक्त एस. आर. मोटकर यांनी केले आहे.

वैधानिक आदेशानूसार रु. 2 लाख किंवा कमी असलेल्या थकबाकीसाठी निर्लेखित करण्यात येईल. रु.2 लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90 टक्के व शास्तीचा 95 टक्के सवलत देण्यात येईल. रु. 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरुन थकबाकीतून मुक्त होता येईल. रु 50 लाखापेक्षा जास्त थकबाकीदारांसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध आहे. अभय योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्क्टोबर 2023 पर्यंत आहे. आवश्यक रक्कम व अर्ज विहित मुदतीच्या आत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी क्रमांक 02362-228651 व ई-मेल आयडी amnestyoros2023@gmail.com वर संर्पक साधावा.