वैभववाडी/प्रतिनिधी:-
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्सविकास खात्याचे माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत येथील दुर्गम भागांतील वाडीवस्ती वरील विशेषतः डोंगर दर्यात असलेल्या धनगर वस्तीतील समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी रस्ते, पाणि, लाईट या मुलभुतसुविधांपासुन वंचित असलेल्या सर्व धनगर वस्त्यांचा सर्वे करून आवश्यक त्या ठीकाणी भुसंपादन करून येथील प्रश्न सोडविण्याची मागणी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सहकारी (NDA) मित्र पक्षाचे नेते, महादेव जानकर यांच्याकडे प्रमोद रावराणे यांनी केली.