शिवसेना आचरा उपविभाग प्रमुखपदी सचिन रेडकर यांची निवड; आ. वैभव नाईक यांनी निवड जाहीर करत दिल्या शुभेच्छा…

20

मालवण/प्रतिनिधी:-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आचरा उपविभाग प्रमुखपदी वायंगणीचे ग्रा.पं.सदस्य सचिन रेडकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही निवड जाहीर करत श्री. रेडकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी वायंगणी येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी पं. स. सदस्य उदय दुखंडे, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक चंदू गोलतकर, वायंगणी सरपंच रूपेश पाटकर, उपसरपंच समृद्धी आसवलकर, बाप्पा वायंगणकर, संजना रेडकर, दिनेश साळकर, नारायण कुबल, अविराज परब, सुनिल माळकर, सदा राणे, संकेत पाटील आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.