करूळ घाटात वाळूचा डंपर पलटी

367
  • चालकाशी संपर्क होत नसल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे

वैभववाडी / प्रतिनिधी : करूळ घाटात वाळू घेऊन जाणारा डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूलाच कलंडल्याने वाळू पूर्ण डंपर मधून खाली पडली असून ड्रायव्हर त्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली दडलाय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. चालकाला संपर्क होत नसल्यामुळे घटनास्थळी पोलीस पोचले असून याबाबत अधिक माहिती घेत आहेत.