वैभववाडीत रान भाजी प्रदर्शन व रान भाजी पाककला स्पर्धेचे आयोजन…

382

 

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी तालुका आत्म समिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालय वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 ऑगस्ट रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे रान भाजी प्रदर्शन व रान भाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे .

आजच्या तरुण पिढीला आहारातील रानभाज्यांचे महत्त्व त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती मिळण्यासाठी व आहारातील रानभाज्यांची असलेली परंपरा पुढे चालू राहण्यासाठी त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे सदर स्पर्धेत महिला महिला बचत गटांना सहभाग घेता येणार असून पाककलेतील विजेत्या महिलेस प्रथम क्रमांक एक हजार रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक 750 रुपये तृतीय क्रमांक पाचशे रुपये उत्तेजनार्थ तीनशे रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे तरी या रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आत्मा समितीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे व तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी केले आहे.