वागदे पेट्रोल पंपांनजिक मोटारसायकचा अपघात…

390

सितराज परब / कणकवली :- मुंबई गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंपानजिक आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल रोड डिव्हायडरवर आदळून अपघात घडला. या अपघातात मोटरसायकल चालक अजय पवार रा सांगवे हा जखमी झाला असून त्याचा पाय जायबंदी झाला आहे. अपघातस्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पाटील, किरण मेथे, रुजाय फर्नांडिस यांनी धाव घेत जखमी पवार ला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.