खांबाळे ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा स्तरीय तृतीय क्रमांक…

376

वैभववाडी / प्रतिनिधी :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन 2020-2021 व 2021-2022 मध्ये खांबाळे ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला होता या पुरस्काराचे वितरण शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) विशाल तनपुरे यांच्या हस्ते खांबाळे ग्रामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

धाराशिव जिल्हयात जिल्हा बदली झालेले तत्कालीन कर्तव्यदक्ष ग्रामसेवक उमेश राठोड यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या 11 महिन्यांच्या अल्प कालावधीत खांबाळे ग्रामपंचायतचा त्यांच्याकडे पदभार होता या कालावधीत त्यांनी चांगले काम केले होते. सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख प्रशासन चालवले होते. गावात अनेक उपक्रम राबवुन शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. 11 महिन्यांच्या कमी कालावधीत जरी खांबाळे ग्रामपंचायतचा पदभार असला तरी त्यांनी अनेक वर्षे लक्षात राहिल असे काम खांबाळे गावात काम केले आहे.

सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता कदम, ग्रामसेवक नयना गुरखे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2 लाख रुपये,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे खांबाळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.