तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई…

132

ब्यूरो न्यूज / मुंबई :- मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली असून हा वीज चोरीचा प्रकार पनवेल शहरात उघडकीस आला आहे.

पनवेल शहरातील भरारी पथकाच्या वतीने वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु असतांना बीएचरोड वरील दत्ता भोईर या उच्चदाब ग्राहकाच्या चिली हॉटेलची तपासणी केली असता भरारी पथकाला अनियमितता आढळून आली. या ग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटरची रिडींग रिव्हर्स करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे  विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ मधील तरतुदीनुसार ग्राहकाने वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत ही वीज चोरी सुमारे तीन कोटी रुपयांची असल्याचे आढळून आले. ग्राहकास वीज चोरी दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम न भरल्यास वीज कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.