मळगाव दरीत बेवारस स्थितीत आढळली दुचाकी…

65

राजू तावडे / सावंतवाडी :- मळगाव घाटीत आज दहा ते बारा फूट खोल दरीत दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. हा अपघात आहे की, अन्य काही याबाबत परिसरात तर्कवितर्क सुरु आहे.

हा प्रकार आज सकाळी उघड झाला. याबाबत माहिती काही स्थानिक युवकांकडून देण्यात आली. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात काहीच नोंद नाही. दरम्यान ही दुचाकी नेमकी कोणाची ? कोणी जखमी झाले आहे का ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.