कणकवलीतील शैलेश करंबेळकर यांचे निधन…

93

कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी व पुरोहित सिद्धेश्वर उर्फ शैलेश गुरुदास करंबेळकर वय ३५ यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री देव काशी विश्वेश्वर देवस्थानचे पौराहित्‍य ते करत असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पुतणे, भावजय असा मोठा परिवार आहे. कणकवली शहराचे ग्रामपुरोहित गुरुदास करंबेळकर यांचे ते सुपुत्र होत. आचरा येथील काॅलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.