सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर…

52

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी नगरपरीषद कर्मचारी नोकर सहकारी पतपेढीच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन दिपक म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.

या संस्थेला या आर्थिक वर्षात ८ लाख २४ हजार ४३६ रूपये नफा झाला. या बैठकीत सभासदांच्या मुलांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थी सत्यम कदम, तेजश्री वेंगुर्लेकर,अक्रम सय्यद, मुग्धा टोपले, युनूस खान, तन्वी गावकर, पीयुष बिद्रे, पर्णवी म्हापसेकर,पृथा कुडतरकर,निहार पालव,प्रियल भोसले,यश बरागडे, गणेश बांदेकर यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर, उपाध्यक्ष संजय पोईपकर , संचालक आसावरी केळबाईकर, देविदास आडकर नागेश बिद्रे, बाबा खान, श्रीमती पवार प्रवीण कांबळे यांच्यासह दिनेश भोसले, परवीण शेख, माजी अभियंता तानाजी पालव उपस्थित होते

यावेळी सभासदांनी संस्थेच्या हितासाठी सुचना केल्या. चेअरमन दिपक म्हापसेकर यांनी सर्वांचे आभार मानले.