राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा गावच्या लोककल्याणासाठी श्री देव बांदेश्वर भूमिका पंचायतन तर्फे मंगळवारी बांदेश्वर मंदिर येथे लघुरुद्र संपन्न झाला. यावेळी बांदा गाव व परिसरातील सर्व लोकांना सुख समृद्धी लाभावी, रोगराई नष्ट होऊ दे, गावावर कोणतेही संकट येऊ नये व अनियमित पडणारा पाऊस व्यवस्थित पडून लोकांची शेती, बागायची व्यवस्थित होऊन शेतकरी वर्ग संपन्न होउंदे, सर्वांना चांगले आरोग्य मिळून दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवस्थानचे प्रमुख मानकरी, बांद्यातील ग्रामस्थ, पुरोहित उपस्थित होते. बांदेश्वर मंदिरातील पुरोहितांच्या हस्ते पूजन होऊन लघुरुद्र संपन्न झाला.