गणेशोत्सवासाठी सौ. अर्चना घारे व सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विशेष बसेस सेवा…

52

राजू तावडे / सावंतवाडी :- गणेशोत्सवासाठी शहरांत राहणारे चाकरमानी कोकणातील आपापल्या गावाला येतात, उत्सवात सहभागी होतात. या काळात बस, रेल्वेला होणाऱ्या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. पुणे-पिंपरी चिंचवड परीसरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी – चिंचवडच्या सहकार्याने अल्प दरात विशेष लक्झरी बसेसची सोय केली आहे. दिनांक 16, 17 व 18 सप्टेंबर अशी तीन दिवस ही बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेक प्रवाशांची या माध्यमातून सेवा करता आली याचे समाधान मला लाभले अशी भावना सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केली.

यावेळी सागर गावडे, गजानन परब, समीर दळवी, अमित वारंग, सुनील वझे, सुदन गवस, सदाशिव मोरजकर व सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.