सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा…

30

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेत पालक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालक ईशा मोंडकर,परशुराम वारंग उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, पालक शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी इयत्ता दहावीच्या नवीन कार्यकारी मंडळाचे स्वागत करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इर्शाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.पालक दिनाच्या या प्रसंगी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः च्या हाताने बनविलेले ग्रिटींग कार्ड पालकांना देऊन पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रिटींग कार्ड वरील पालकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश वाचून पालकांचे डोळे अश्रूंनी भरून आले.

यावेळी प्रशालेला वेळोवेळी मदत करणाऱ्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते फुलझाडांची रोपे देऊन आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी पालकांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 68 वर्षाच्या आजीने केलेले कोळी नृत्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका मिसाळ यांनी केले तर आभार शिक्षिका धनश्री नाईक यांनी मानले.