काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

44

राजू तावडे / सावंतवाडी :-

राष्ट्रीय काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. श्री. सांगेलकर हे दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देत आले आहेत. यावर्षीही त्यांनी तेल,कडधान्याची,गुळ,साखर, अगरबत्ती,कापूर असे साहीत्य तालुक्यातील तब्बल 400 ते 500 लोकांपर्यत पोहचविली आहे. सध्याच्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या संसाराला थोडाफार हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे सावंतवाडी शहरध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस रुपेश आईर, बांदा विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब देसाई , सावंतवाडी काँग्रेस शहर पदाधिकारी श्री. समीर भाट उपस्थितीत होते.