राजू तावडे / सावंतवाडी :- राज्य व केंद्र सरकारच्या योजनांद्वारे गावात लाखों रुपयांचा निधी आणल्यामुळे आणि सर्व पक्ष गाव विकासासाठी एकत्र झाल्यामुळे हा निधी मिळाला. यामध्ये गावाला मिळालेल्या अनेक पुरस्कार निधीचाही समावेश आहे. गावातील शाळा, अंगणवाडी, नळपाणी योजना, सौरऊर्जा हि आधुनिकतेची वाटचाल आहे. सरपंच व सदस्य यांनी केलेले हे कार्य कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी केले.
कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन)ग्रामपंचायत नूतन ईमारत उद्घाटन व विकास कामे लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी उपसभापती राजेंद्र निंबाळकर, सेनेचे बाबूराव धुरी, संजय गवस भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उद्योजक विवेकानंद नाईक, सरपंच सौ. संगिता सुहास देसाई, रामदास मेस्त्री, योगेश महाले, संजय नाईक ग्रामपंचायत सदस्य संदेश देसाई, गोविंद नाईक, सुरत शिरसाठ, सदस्या मयुरी महेश पालव, सानवी संदिप दळवी, संजना संजय सावंत, ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार व स्वागत सरपंच व सदस्य यांचे हस्ते करण्यात आला. नूतन इमारतीचे फित कापून माजी आमदार राजन तेली यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना संरपच सौ. संगिता सुहास देसाई म्हणाल्या, ह्या ग्रामपंचायतीच्या सन स्थापने पासून मी कार्यरत असून, ईमारत भुंखड मिळविणे पासून ते टेबल खुर्ची, साहित्य व नव्या ईमारतीची उभारणी यामध्ये आपल्याला सर्वांच्या सहकार्याने यश मिळाले. अनेक पुरस्कार प्राप्त करत सोळा लाख पच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळविला. सर्व राजकीय पक्षनेत्यांनी, आमदार, खासदार, मंत्री त्यांच्या सहकार्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊ शकला. असे सरपंच देसाई म्हणाल्या.