माध्यमिक शिक्षकांची नाधवडेत आत्महत्या; कारण गुलदस्त्यात…

325

वैभववाडी / प्रतिनिधी :- तालुक्यातील नाधवडे गावठण येथील रहिवाशी श्रीकांत शिवराम शेटये (49 ) यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावुन आपल्या जीवनाचा शेवट केला आत्महत्या करण्यामागचे कारण समजु शकेल नाही याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

श्रीकांत शिवराम शेटये हे कणकवलीतील बीडवाडी हायस्कूल येथे शिक्षक म्हणुन नोकरीला होते.काल दिवाळीची सुट्टी असल्याने नाधवडे येथील आपल्या घरी आले होते पत्नी आणि मुले कणकवलीतच होती आज सकाळी त्याची बहीण श्रुती खाडये हीला दरवाजा बंद दिसल्याने पाहण्यासाठी गेली असता घरातील पंख्याला दोरी बांधून लटकलेला दिसुन आले ती घाबरून आरडाओरड सुरू केली यावेळी शेटये यांचा चुलत पुतण्या भावेश रघुनाथ शेटये ( 20) हा आला त्याने ताबडतोब पोलिसात खबर दिली .याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.