माजी नागराध्यक्ष समीर नलावडेनी केला स्वराज चव्हाणचा सन्मान. आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल प्राप्त केल्यामुळे करण्यात आला सन्मान. .

127

 

कणकवली/प्रतिनिधी.

नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई महाराष्ट्र यांनी “रंगोत्सव सेलिब्रेशन” या टॅग लाईन खाली आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये कु. स्वराज विठ्ठल चव्हाण याला “गोल्ड मेडल” तसेच “सिल्वर मेडल” प्राप्त झाले आहॆ आणि म्हणूनच कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कु.स्वराज विठ्ठल चव्हाण याचा आज आपल्या निवासस्थानी सत्कार केला.स्वराज हा विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे चौथी मध्ये शिकत असताना त्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.स्वराज यास चित्रकलेची आवड असून विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात त्याचा हातखंडा आहे. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे त्याच्यावर चित्रकलेचे उत्तम असे संस्कार झाले आणि त्यामुळेच त्याला अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून गोल्ड मेडल तसेच सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे.स्वराज हा आता माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे इयत्ता पाचवी मध्ये पुढील शिक्षण घेत असून तेथे देखील चित्रकला शिक्षकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चित्रकला स्पर्धा तसेच चित्रकलेतील बारकावे तो शिकत आहे.अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून गोल्ड मेडल प्राप्त केल्यामुळे समीर नलावडे यांच्याकडून नुकताच कु.स्वराज विठ्ठल चव्हाण याचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री नलावडे यांनी कु स्वराज यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून भावी शैक्षणिक वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वाशन देखील दिले.यानिमित्ताने कु.स्वराज विठ्ठल चव्हाण याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.