करुळ घाटात दोन कारमध्ये अपघात…

140

वैभववाडी / प्रतिनिधी :- करूळ चेक नाका नजीक दोन कार मध्ये अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच करूळ पोलीस चेक नाक्यावरील पोलिसांनी धाव घेतली. व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.