कलंबिस्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कौतुक…

128

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि हे सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त सारख्या ग्रामीण भागात भरवले गेले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कलंबिस्त हायस्कूलने हे प्रदर्शन यशस्वी केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील, अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी विज्ञान प्रदर्शनास ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त हायस्कूलमध्ये शनिवारी आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ऑनलाईन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, एकनाथ सोनुर्लीकर, विभाग प्रमुख जीवन लाड, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, संजय पालकर, विनायक सावंत, श्री. संदेश सोनुर्लीकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र घावरे,  सचिव चंद्रकांत राणे, बाबा राऊळ, वसंत सावंत, शंकर राऊळ, चंद्रकांत राऊळ, लाडजी राऊळ, मुख्याध्यापक अभिषेक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग काकतकर, गट शिक्षण अधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्गा साळगावकर, काका मांजरेकर, म. ल. देसाई, एस. एन. सुर्वे, शशिकांत धोंड, सरपंच सुप्रिया राऊळ, सौ. पवार, नंदू गावडे, स्नेहा कुडतरकर, माजी सरपंच बाळू सावंत, प्रल्हाद तावडे, बाळा राजगे, राजेश पास्ते, सुनील सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री. राजन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक रामचंद्र घावरे यांनी केले तर सूत्रसंचालन किशोर वालावलकर व आभार मुख्याध्यापक अभिषेक जाधव यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शाळा प्रदर्शनात सहभागी झाले होते.