आंगणेवाडी जत्रोत्सवाची तारीख अध्याप निश्चित नाही; आंगणे कुटुंबियांची माहिती…

101

अफवांवर विश्वास ठेवू नका…

संतोष हिवाळेकर / पोईप :- कोकणचे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आहे. सोशल मीडियावर मागील दोन दिवसा पासून या जत्रोत्सवाच्या तारीख निश्चिती बाबत चुकीचे संदेश प्रसारित होत असून आंगणे कुटुंबियांकडून जत्रोत्सवाच्या तारखे बाबत अधिकृत घोषणा जो पर्यंत केली जात नाही तो पर्यंत या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.