पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव दाखल करावे…

106

ओरोस / प्रतिनिधी :- दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीच्या सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या पात्र मतदारांनी अजूनही मतदार यादीत नाव दाखल केले नाहीत, अशा मतदारांनी दिनांक ५जानेवारी २०२४ अखेर पर्यंत मतदार यादीत नाव दाखल करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांनुसार दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी तारीख देण्यात आलेली होती. सदर विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार होती. तथापि, भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम घोषित केलेला आहे. वरील सुधारीत कार्यक्रमांनुसार दावे व हरकती निकाली काढणे याकरीता दि.१२ जानेवारी २०२४ तसेच ज्या मतदारांनी मतदार यादीत अद्याप पर्यंत नाव समाविष्ट केलेले नाहीत, अशा मतदारांना करीता दिनांक ५जानेवारी २०२४ पर्यंत नमुना ६ भरून नाव मतदार यादीत दाखल करता येणार आहे. नमुना नं.७ भरून मतदार मयत असल्यास नाव वगळणी, नमुना नं.८ भरून मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावात दुरुस्ती करावयाची असल्यास ती सुध्दा करता येणार आहे.