कणकवली तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका…

109

सितराज परब / कणकवली :- देशाच्या प्रत्येक भागात थंडीची पातळी सातत्याने वाढत आहे. धुके आणि थंडीमुळे हातपाय सुन्न होऊ लागले असतानाच आता राज्यात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. आज देखील कणकवली तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने रात्री 9 च्या सुमारास सुरवात केली

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू या पिकावर मोहोर आल्याचे दिसून येत आहे. या पावसाचा फटका या फळपिकावर बसण्याची शक्यता आहे.