रेडी रेकनरचे दर 25 वर्षांसाठी न वाढविण्याच्या निर्णयाचे क्रेडाई अध्यक्ष नीरज देसाई यांच्या कडून आभार…

95

राजू तावडे / सावंतवाडी :- महाराष्ट्र शासनाने शहरातील जमिनींच्या रेडी रेकनरचे दर पुढील 25 वर्षांसाठी न वाढविण्याचे ठरवल्याने सावंतवाडी क्रेडाईचे अध्यक्ष नीरज देसाई यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून आभार मानले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडे क्रेडाईच्या वतीने अनेकवेळा शहरातील जमिनीचे दर स्थिर ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. जेणेकरून बांधकाम व्यवसायाला तेजी प्राप्त होईल. जर रेडी रेकरनर प्रमाणे जमिनीचे दर बदलत गेले तर त्याचा भार ग्राहकांवर येत असतो. त्यामुळे हे दर स्थिर ठेवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.त्याला अखेर यश आले आहे.

क्रेडाईच्या वतीने महाराष्ट्रातील ६६ शहरांच्या सर्व ३५०० सभासदांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्या कडे ही मागणी करण्यात आली होती. या मागणीवर शासनाकडून गंभीर पणे विचार करण्यात आला असून रेडी रेकनरचे स्थिर ठेवण्यात आले आहेत. हे दर पुढील २४-२५ या वर्षा साठी न वाढविण्याची निर्णय शासनाकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यामुळे सध्या प्रगतीपथावर असलेला बांधकाम व्यवसाय यामुळे अजून अधिक प्रगती करून शासनाच्या तिजोरीत नक्कीच जास्त भर पडणार आहे. मागील वर्षाचे ५० हजार कोटीचे वाढीव उद्दीष्ट दर न वाढविता साध्य झाल्याचे ही सावंतवाडीचे क्रेडाई अध्यक्ष नीरज देसाई यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.