उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पेश सुद्रिक त्यांच्यातर्फे वह्यावाटप… 

29

राजा दळवी / कणकवली :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळसुली गावातील शालेय विद्यार्थ्यांना कळसुली ग्राम पंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कळसुली हर्डी प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद दिडंवणेवाडी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक वस्तूचे वाटप करण्यात आले.

कल्पेश सुद्रिक गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत असून ते जिल्हाध्यक्ष- सिंधुदूर्ग जिल्हा सु. बे. विद्युत संघटना , कै. सुरेश सु्द्रिक चैरिटेबल ट्रस्ट चे सचिव , इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर (बी.ई.) अशा ठिकाणीं काम करत असताना सामाजिक भान राखत विविध उपक्रमशील कार्यक्रमात सहभागी होत असतात.

याप्रसंगी श्री.कानेकर, तातु गावकर, मधुकर चव्हाण, महादेव वरक, सागर शिर्के, अक्षय मुरकर, पंढरी मुरकर, प्रकाश सातवसे, लिलाधर लाड, बाळा खरात , ग्रामपंचायत सदस्या भावना तावडे, गावकर गुरुजी, दिनेश सुद्रिक सर, शाळेच्या मुख्याधिपिका , अंगणवाडी सेविका, आदी उपस्थीत होते.