मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीच्या जनसंपर्क अधिकारीपदी साबाजी परब तर सहसचिव पदी मकानदार…

36

राजू तावडे / सावंतवाडी :- मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी संस्थेचा विस्तार होत आहे. या संस्थेच्या जनसंपर्क अधिकारीपदी साबाजी परब तर फिजा मकानदार यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रतिष्ठानचे सचिव ललित हरमलकर यांनी आज केली आहे.

गेली अनेक वर्षे मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढीला दिशा देण्याचं काम आम्ही करत आहोत. युवकांना निरोगी आरोग्याची गरज आहे. त्याच दृष्टीने आम्ही लवकरच आरोग्य शिबीराचे आयोजन करणार आहोत. मल्ल सम्राट प्रतिष्ठान मातीतल्या खेळांचे देखील आयोजन करते. मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. गेल्यावर्षी कुस्ती स्पर्धा आम्ही भरवली होती. अशीच भव्य स्पर्धा भरविण्याचा आमाचा मानस आहे. त्यादृष्टीनेच संस्थेच्या जनसंपर्क अधिकारीपदी साबाजी परब तर फिजा कमानदार यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याचे उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील यांनी सांगितले. यावेळी मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, सचिव ललित हरमलकर, जनसंपर्क अधिकारी साबाजी परब, सहसचिव फिजा मकानदार आदी उपस्थित होते.