संत गाडगे महाराज स्वच्छता संदेश पार्श्वभूमीवर बांद्यात स्वच्छता मोहीम…

45

राजू तावडे / सावंतवाडी :- संत गाडगे महाराज स्वच्छता संदेश देण्यासाठी व लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बांदा येथील बांदेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. नवरात्रोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. बांदा येथील श्री भूमिका देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्सवात विजयादशमी पर्यंत साजरा केला जातो. यावेळी हजारो भावीक भूमिका देवीचे दर्शन घेतात, तर या दहा दिवसात माहेरवाणी श्री भूमिका देवीची ओटी भरून तिचा आशीर्वाद घेतात. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी श्री भूमिका देवी व श्री बांदेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी बांदा ग्रामपंचायत सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, स्नेहा सावंत, लक्ष्मी सावंत, माजी उप सरपंच जावेद खतीब, संजय सावंत व काही ग्रामस्थ उपस्थित होते.