राजा दळवी / कणकवली :- कणकवली तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल बागवे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य अक्षय गुरव, लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारे, मनीषा तांबे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रेरित होऊन आपण हा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत आहोत असे सरपंच अनिल बागवे यांनी जाहीर केले. सरपंच बागवे व सदस्य आणि सर्व प्रवेश करत्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भरणी येते आयोजित जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात स्वागत केले.
या पक्ष प्रवेशात आनंद साळस्कर, गंगाराम गुरव गणपत गुरव,संजय गुरव,रामचंद्र गुरव, संजय सावंत, प्रकाश बागवे, रमेश जगताप, मंगेश जगताप विश्वनाथ दळवी चंद्रकांत पाडावे, सुरेश साटम, दीपक बागवे, मंगेश पालकर,अशोक राऊळ,चंद्रकांत जगताप, सचिन चव्हाण, मंगेश चिंचवलकर, सुरेश घोडणेकर, सागर गुरव,मंगेश शेट्ये, सुयोग पाडावे,सुदर्शन बागवे,सतीश सावंत, निलेश जगताप, ओमकार गुरव, समीर गुरव, सुरेश गुरव, बबन चिंचवडकर,विलास जगताप, महेश गुरव यांच्या समवेत शेकडो जणांनी प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राजू हीर्लेकर, संदीप सावंत,गणेश तांबे,किरण मेस्त्री,माजी सरपंच भोगले , अशोक गुरव, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.