माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याकडून बसण्याच्या बाकांचे वाटप…

45

राजू तावडे / सावंतवाडी :- माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी व कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात बसण्याच्या बाकांचे वाटप करण्यात आले. हे बाक शहरात, गावात पर्यटन स्थळी, मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.

माजी आमदार परशुराम यांच्या सौजन्याने तसेच सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, आबा चिपकर, बाळा बहिरे, मंदार नाईक, संदीप लाड यांच्या माध्यमातून सावंतवाडी व कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात हे बाक बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात सत्तर ते ऐंशी बाक बसविले जाणार आहेत. पर्यटन स्थळ, तीर्थ स्थळ, उद्याने अशा मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळेच्या आवारात ही बाक बसविले जातील अशी माहिती त्यानी दिली. उपरकर यांच्या सार्वजनिक उपक्रमाचा भाग म्हणून या बाकांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपरकर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.