दसरा व दिवाळी सणानिमित्त कॅथॉलिक उत्सव ठेव योजना…
राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नामवंत व अद्यावत काम करणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सावंतवाडी या संस्थेचा ३० वा वर्धापनदिन सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रदान कार्यालयात प्रमुख पाहुणे रेव्ह. फादर रॉजर डिसोजा तसेच सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला फादर रॉजर डिसोजा यांनी प्रार्थना केली. तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित फादरानी व ग्राहकांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सिस्टर ऑफ काइस्ट, इन्सुली बांदा या मतिमंद लोकांसाठी सेवा देणाऱ्या संस्थेच्या कार्यासाठी कॅथोलिक सोसायटी तर्फे आर्थिक मदत देण्यात आली व मुलांसाठी दुपारचे जेवण देण्यात आले.
संस्थेने सभासद, ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण होण्याकरिता आतापर्यंत कामाची कटिबद्धता बाळगळी आहे असे सांगून संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्याऱ्या संस्थेच्या सर्व निष्ठावंत सभासद, ग्राहक यांचे अध्यक्ष श्रीमती अनमारी जॉन डिसोजा यांनी मनःपूर्वक आभार मानले.
३० व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून विशेष ऑफर म्हणून दसरा व दिवाळी सणानिमित्त कॅथॉलिक उत्सव ठेव योजना सुरू करण्यात आली असून सदर ठेव योजनेची मुदत २१ महीने आहे. व्याज दर ८.५० टक्के आहे तर ज्येष्ठ नागरिक महिला व अपंगांकरिता ९ टक्के व्याजदर आहे. आपली गुंतवणूक करून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अनमारी डिसोजा यांनी यावेळी केले.