आज आशीये दत्त मंदिर येथे साधना या मैफिलीचे गंधर्व तर्फे आयोजन…
राजा दळवी / कणकवली :- कणकवलीकरांच्या सांगीतिक अभिरुचीला सातत्याने प्रेरणा देण्याचे काम गंधर्व फाउंडेशन कणकवली करीत आहे. गंधर्व सभेच्या माध्यमातून भारतातील अनेक आश्वासक संगीत साधक गायक वादक आपली कला कणकवलीत सादर करून गेले आहेत. गोव्यातील कलावंतांचे आणि गंधर्वचे सूर मात्र अत्यंत आपुलकीने जुळले आहेत. गोमंतकीय कलाकार कणकवलीकर रसिकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. याच सुरेल भावनेतून शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी साधना संगीत प्रतिष्ठान गोवा कणकवलीत छोटेखानी संगीत समारोह गंधर्वच्या सहकार्याने आयोजित करीत आहे.
आज, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणाऱ्या या स्वर महोत्सवात सौ. दीक्षा कोंडुरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, विद्वान डॉ. श्री. चेतन मूर्ती यांचे मृदंगम वादन, श्री. विक्रांत नाईक यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनी साथ श्री. सुजन सावंत व श्री. राज केरकर तर तबला साथ श्री. चेतन नाईक व श्री. अनिष कोंडुरकर करणार आहेत.
सर्व रसिकांसाठी मोफत असलेल्या या साधना स्वरोत्सवास सर्वांनी उपस्थित राहून मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गंधर्व फौंडेशन तर्फे करण्यात आले आहे.






