देवगड / प्रतिनिधी :- रामेश्वर धरिवाडी गावात निलेश बांदकर यांच्या घरी संदेश पारकर यांनी दिली सदिच्छा भेट.. रामेश्वर गावातील पूर्ण जनता यावेळी संदेश पारकर यांच्या पूर्ण पाठीशी राहणार आणि संदेश पारकर यांना विजयी करणार असा निश्चय येथील जनतेने केला.. नितेश राणे यांना या भागातून हद्दपार करणार असे उद्गार येथील ग्रामस्थांनी येथील बैठकीत बोलून दाखवले. घराणेशाही असणारा आमदार नको तर सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असणारा संदेश पारकर सारखा आमदार व्हावा असा निश्चय बैठकीत करण्यात आला… यावेळी त्यांच्यासोबत मिलेश बांदकर, महेश धारकर, भरत धारकर, अजित धारकर, सचिन पुजारे, दीनानाथ केळकर, हरिश्चंद्र पुरळकर, दत्ताराम धारकर, सचिन केळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.