देवगड / प्रतिनिधी :- राष्ट्रीय संस्कार संवर्धन व विद्या विकास मंडळ जामसंडे यांच्या वतीने दीपावली निमित्त मोफत एक दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिनांक ७ नोव्हेंबर रोजी श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथील नलावडे सभागृहात
आयोजित करण्यात आले आहे. हे एकदिवशीय प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे. पर्यंत खुले राहणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळातील विविध प्रकारची शस्त्र, गडकिल्ले, नाणी, मोडी लिपी कागदपत्रे आपणास या प्रदर्शनीत पहावयास मिळणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित पुस्तके देखील येथे विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनकार्यावर ससंदर्भ प्रकाश टाकणारे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या दोन्ही संस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीची वैशिष्ट्ये :- व्याख्यान,शिवशंभू विचार दर्शन,प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन , शिवकालीन नाणी प्रदर्शन,मोडी दस्तऐवज, प्राचीन खेळ , छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित पुस्तक विक्री देखील होणार आहे.