उपस्थित राहाण्याचे श्रीराम चव्हाण यांचे आवाहन…
राजू तावडे / सावंतवाडी :- रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. या वेळेत आयोजित केला आहे. पाटबंधारे (जलसंपदा) विभागातील सेवानिवृत्त बांधवांचा हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. तो सर्वांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने, सहयोगाने यशस्वी करुया. एकत्र येऊया, भेटूया, एकमेकांची विचारपूस करुया. हा एक दिवस स्वतःसाठी, सहकाऱ्यांना भेटण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी आणि स्वतःला आनंद मिळविण्यासाठी साजरा करूया आणि एक होवूया असे आवाहन स्नेह मेळाव्याचे आयोजक श्री. श्रीराम चव्हाण (सेवानिवृत्त भांडारपाल) यांनी केले आहे.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी कार्यक्रम नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून रत्नागिरी येथील जबाबदारी दिगंबर लांजेकर व श्रीमती टेंगशे यांच्यावर सोपवली आहे. तर मंडणगड,दापोली,खेड – श्री. शिरीष मेहता, गुहागर, चिपळूण – नरेंद्र बेलवलकर, सतिश वीरकर, अलोरे – बी. जी. दाभोळे, भरत माने, संगमेश्वर – संजय मुंगळे, डोंगरे, लांजा, राजापूर – संदेश राजाध्यक्ष, देवगड, वैभववाडी, कणकवली- महेंद्रकुमार मुरकर, बाबुराव पाटेकर, कुडाळ, मालवण – श्रीराम चव्हाण, राजन वालावलकर, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग – राजू तावडे, अर्जुन आयनोडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या मेळाव्याच्या वेळीची सुरुवात दिप प्रज्ज्वलनाने होईल. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उपस्थितांचा स्व-परिचय, सामुदायिक वाढदिवस सेलिब्रेशन, ज्येष्ठांचा सन्मान (७५ वर्षांवरील), सहभोजन, वैयक्तिक गुणदर्शन कार्यक्रम, भेटवस्तू प्रदान, समारोप व आभार असे कार्यक्रमाचे नियोजन आहे. अधिक माहितीसाठी श्री. दिगंबर लांजेकर, रत्नागिरी, मोबा. 9422965792 यांच्याशी संपर्क साधावा असे श्री. चव्हाण यांनी सांगितले आहे.