राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि नेमबाजी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक ॲड. विक्रम भांगले यांची उत्तराखंड डेहराडून येथे सुरु झालेल्या 38 व्या नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा हस्ते करण्यात आले.
ॲड. भांगले हे सुप्रिम कोर्ट ऑफ इंडियाचे वकील असून यांनी आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धामध्ये जुरी , प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी तसेच आयोजन समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
मुख्य पान चालू घडामोडी 38 व्या नॅशनल गेम्स मध्ये ॲड. विक्रम भांगले यांची अंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी...