वैभववाडी / प्रतिनिधी :- महायुती सरकारने एस.टी तिकीट दरवाढ केल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी वैभववाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता वैभववाडी बसस्थानक येथे आंदोलन करण्यात करून निषेध करण्यात येणार आहे.
तरी वैभववाडी तालुक्यातील शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना संलग्न संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी तसेच सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके आणि युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.