सावंतवाडी सर्वोदयनगर रहिवाशींचे प्रजासत्ताक दिनी स्नेहसंमेलन साजरे…

85

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदय नगरमधील सर्व बंधू-भगिनी, आबाल-वृद्ध एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. यावेळी सर्व रहिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वोदयनगर गार्डनमध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. यावेळी सर्वोदयनगर मधील लहान चिमुकल्यांपासून आबाल-वृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.

यावेळी अनेकांनी गायन, वादन, मिमिक्री, नृत्य, नकला, एकपात्री प्रयोग तसेच महिलांनी विशेष समूह नृत्य सादर केली. स्नेहसंमेलना नंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. सर्वोदयनगर निवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मेघना राऊळ व अजय गोंदावळे यांच्या पुढाकारातून या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून विद्याधर तावडे, सौ. तावडे, पुंडलिक राणे, श्री.व सौ. कोरगावकर, श्रीमती दुःखंडे, सौ. पटेल, अस्मिता शिरोडकर व सौ. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महिलांसाठी विशेष ‘हळदीकुंकू’ कार्यक्रम देखील संपन्न झाला. या कार्यक्रमात ॲड. प्रकाश परब यांनी गायन केले तर प्रा. सुधीर बुवा यांनी गीत गायन,  प्रकाश राऊळ व मेघना राऊळ यांनी गीत गायन, अभिषेक राऊळ गीत गायन, हायजीन फिलिप यांनी उत्कृष्ट कीबोर्ड वादन सादर केले. तर अर्णव कोरगावकर देशभक्तीपर गीत, नित्या शंकर धुरी नृत्य आणि देशभक्तीपर गीत सादर करून आपल्या कलेचे दर्शन घडविले. अमृता साटेलकर गीतगायन, अनुप्रिया अजित राणे नृत्य,, मानवी नाईक नृत्य, हार्दिक वसंत तावडे (अभिनय) – नाट्य सादर करून जंकफूड विषयी संदेश दिला तर वेदश्री अभिषेक पाल हिने नृत्य, अमृता शंकर धुरी – गायन, वीरा पडवळ – नृत्य, वासुदेव शिरोडकर यांनी गायन केले.

महिलांच्या समूह नृत्यात अर्पिता मठकर, स्वरा मठकर, संध्या मठकर, करिष्मा शिरोडकर, अस्मिता शिरोडकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. दीप्ती बुवा, प्रज्ञा कोरगावकर, सुजल राऊळ, वर्षा पटेल, उर्मिला दुखंडे, शितल पाटील यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राऊळ व मेघना प्रकाश राऊळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनायक चव्हाण यांनी मानले.