व्यापारी एकता मेळाव्याचे शानदार उद्घाटन…
Sindhureporter live
वैभववाडी / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार आहे. प्रकल्प येणार या सर्वच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत. व्यापारी म्हणून तुमची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी शासकीय आधीकरी आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक दर तीन महिन्यांनी घेवून जिल्यातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवूया आणि जिल्ह्याच्या व्यापाराला नवी ओळख निर्माण करून देवूया असे आवाहन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी ते म्हणाले, जिल्ह्याच्या व्यापाऱ्याची संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मला मिळालेली आहे.
आपल्याला कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. चांगल्या सेवा सुविधा दिल्या जातील. कोणत्याही जिल्ह्याची बाजारपेठा या त्या जिल्ह्याच्या विकासासाठी,आर्थिक उन्नती होण्यासाठी गरजेची आहे. पोलीस यंत्रणेनेसोबत बैठकीत मी व्यापारी,नागरिक यांना त्रास देवू नये. सुरक्षित व्यापार करता यावा यासाठी सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी पासून मी आमदार असल्यापासून व्यापारी आणि नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे माहित आहे. सरकारच्या संपूर्ण यंत्रणा आपल्या साठी आहेत.
जिल्ह्याचे व्यापार धोरण ठरविण्याची गरज आहे. अधिकृत दुकाने राहिली पाहिजेत.ती वाढली पाहिजेत. अनधिकृत व्यापाराला अंकुश येण्यासाठी आपण जागृत असेल पाहिजे. सर्वजण एकत्र मिळून काम केले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड होता नये. असे सांगताना कणकवलीत १६ लोक थेट युपी मधून येवून व्यापार करतात. नोयेडा मधील माणूस आपल्या बाजारात बॅग विकत होता. संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र आपल्याला जागृत राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा विचार व्यापारी संघानेही केला पाहिजे अश्या अपेक्षा यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केल्या.