हेलिकॉप्टर गावात आल्याने उत्साहाला उधाण….

114

नाधवडे ग्रामस्थांनसह शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्री नितेश राणे यांचे स्वागत…

Sindhureporter live
वैभववाडी / प्रतिनिधी :- राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाधवडे येथे हेलिकॉप्टरने उतरणार हे कळतात सर्वांची उत्सुकता वाढली. त्यातच शाळकरी मुलांना हेलिकॉप्टर कसे असते, ते कसे उतरते हे पाहण्याची आणखीनच उत्सुकता होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री वैभववाडीत हेलिकॉप्टरने येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गावकरी आणि शाळकरी मुलांमध्ये तर मोठाच उत्साह पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उतरल्यानंतर मंत्री नितेश राणे यांचे स्थानिक पदाधिकारीऱ्यानी स्वागत केले त्याच प्रमाणे शाळकरी मुलांनीही त्यांचे स्वागत केले.या मुलांनची मंत्री नितेश राणे यांनी विचारपूस करत प्रत्येक मुलाच्या हातावर चॉकलेट दिले आणि विद्यार्थ्यांच्या या आनंदाला आणखीनच गोडवा आणला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे व्यापारी मेळावा निमित्त नाधवडे येथे हॅलीकाॅप्टरने आगमन झाले. पालकमंत्री झाल्यानंतर पहील्यांदाच मंत्री नितेश राणे यांचे आगमन होताच वैभववाडी वासियांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नाधवडे गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उतरणार याची उत्सुकता गेली दोन दिवस सर्वांना लागली होती. नाधवडे येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हेलिकॉप्टर विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले. उपस्थित शिक्षकांनी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, परशुराम इस्वलकर,शिक्षिका राजश्री शेट्ये , सरपंच लीना पांचाळ, उपसरपंच प्रफुल कोकाटे, माजी सरपंच शैलजा पांचाळ व गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.